जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 12 May 2018 08:08 AM (IST)
जळगाव-धुळे रस्त्यावर पारोळा तालुक्यातील दळवेल गावाजवळ मारुती कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
जळगाव : मारुती कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव-धुळे रस्त्यावर पारोळा तालुक्यातील दळवेल गावाजवळ मारुती कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पाचोरा येथील वाणी परिवार धुळ्याला विवाहासाठी गेला होता. विवाह आटोपून परत येत असताना हा अपघात झाला. अपघात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला आहे.