Winter Assembly Session : कोरोनाचं कारण देऊन नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचं तत्कालीन सरकारनं टाळलं. आता तेच तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी करत आहेत. हे सकार घटनाबाह्य असल्याचा विरोधकांकडून आरोप केला जातोय. परंतु, आमचं सरकार हे घटनेनुसार स्थापन झालेलं सरकार आहे. 2019 चं सरकार हे अनैतिक सरकार होतं. अजित पवार यांच्या तोंडून खोक्याची भाषा शोभत नाही. खोक्यांचे थर लावले तर शिखर इतकं उंच होईल की समजणार पण नाही असे म्हणत या राज्याला आम्हाला लवासा करायचा नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना  लगावलाय. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरवात होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


मुख्यमंत्री म्हणाले, "सीमावाद अतिशय गांभीर्याने घेतला आहे. सीमावादावरून कोणीही राजकारण करू नये. आम्ही मनात आकस ठेवून काम करत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अतीशय संवेदनशील आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढण्यासाठी या सरकारने मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना प्रश्नांना प्राधान्य देऊन आम्ही काल केलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सरकारकडून जे जे काही करता येईल ते आम्ही करू.  सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याकडे आमचा फोकस आहे."  


"आम्ही चार महिन्यात एवढं काम केलं की, पुढील दोन वर्षांत आम्ही किती काम करू याची धास्ती काही लोकांनी घेतली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका केली जात आहे. दिवाळीच्या शिध्यावरून देखील या सरकारवर टीका केली. परंतु, दिवाळीचा शिधा किती लोकांपर्यंत पोहोचला याची आमच्याकडे आकडेवारी आहे. 96 टक्के लोकांना दिवाळीचा शिधा पोहोचला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हैसाळच्या योजनेचा विस्तार करण्यात येईल. यातून जत तालुक्यातील 48 गावांना पाणी मिळण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार कोटींचा निधी मंजूर केलाय, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.  


महत्वाच्या बातम्या


Gram Panchayat Election 2022 : कुठं ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्वीक, तर कुठं बोगस मतदान, जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात कुठं काय घडलं?