नवी दिल्लीः मुंबई हायकोर्टात 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. औरंगाबादच्या विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाचं प्रकरण तातडीने निकाली काढण्यासाठी याचिकाकर्त्याच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत यापूर्वी हायकोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या स्थगितीली सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं.

संबंधित बातम्याः 


कोपर्डी घटनेच्या निषेधासोबतच विविध मागण्यांसाठी नांदेडमध्येही मराठा मूकमोर्चा


मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दूर ठेवून मराठा आंदोलनाची कोंडी फोडावी: संभाजीराजे


सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार


मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले