औरंगाबाद : रमझानच्या अनुषंगाने कोणतेही सण जाहीर साजरे न करण्याचा सूचना आहेत. अनेक मौलवींनी तसा फतवा काढला आहे. शहरात संचारबंदी लागू आहे, मात्र गरज पडल्यास कडक अंमलबजावणी करणार आहे. कोणी सामाजिक तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.


राज्यातील सहा जेल लॉक डाऊन करण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेले कारागृह लॉक डाऊन करण्यात आले आहे. कारागृह पोलीस जेलमध्येच राहणार, नव्याने कोणीही आत जाणार नाही किंवा बाहेर येणार नाही. औरंगाबाद विभागात कोरोनाबाबत पोलीस आरोग्य इतर लोक काम करत आहेत. कोरोनवर नियंत्रण आणण्याचं काम चालू आहे. 29 बाधित लोक आहेत, 11 लोकांमुळे इतर लोकांना बाधा झाली, 1300 चाचण्या शहरात झाल्या, 1000 स्क्रिनिंग झाली, 1300 बेडची, व्यवस्था, सारीचे 228 रुग्ण आढळून आले आहेत. ताब्लिकीचे 102 लोक आले त्यांना विलगिकरन केले, त्यांनी ट्रॅव्हल व्हीजा वापरला किंवा त्याचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र  शेती माल विक्रीला कुठलीही अडचण नाही.


अनिल देशमुख म्हणाले, बाहेरच्या विद्यार्थ्यना आणि परप्रांतीयांना सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. तशी विनंती पंतप्रधानांना केली होती, मात्र काही मुख्यमंत्र्यांनी कोणालाही बाहेर राज्यातून येऊन देणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुळे ते शक्य नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. चाचण्या अधिक झाल्या की बाधित लोकांचा आकडा वाढतो. त्यामुळे महाराष्ट्रात आकडा वाढल्याचं दिसून येतो.


संबंधित बातम्या :