मुंबई : कोरोनामुळे अर्थव्यवस्था चिखलात रुतले आहे. अर्थचक्र हे फिरले पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरूपात उद्योगधंद्यांना आपण परवानगी देत आहोत.ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधील माफक स्वरूपात आपण उद्योगांना परवानगी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुपारी जनतेशी लाईव्ह संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आकडे कमी आले म्हणून भ्रमात राहत कामा नये. परवानगी दिली म्हणून गाफील राहू नये. उद्योगधंदे सुरू करताना मजुरांची मजुरांची ये जा न करता काम सुरू करायची परवानगी दिली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत. जिल्ह्याच्या जिल्ह्यात ये जा करायला परवानगी देत आहोत. दुसऱ्या जिल्ह्यातील लोकं येणार नाही.


'राज्यातील मजूर सहकार्य करत आहे. केंद्र सरकारबरोबर आमची चर्चा होत आहे. महाराष्ट्रात काम सुरू होत आहे. इच्छा असल्यास  पुढे या पण तुम्हांला घरी सोडण्याचे आश्वासन देत आहोत.घरी आनंदाने जा, भीती वाटते म्हणून जाऊ नका, हे दिवस लवकर संपतील'.  मुंबई महापलिका आणि बिर्ला  1800 120 8200 50  आदिवासी विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई 1800 102 4040 तसेच घरगुती हिंसा होत असेल तर 100 नंबरवर फोन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


उद्धव ठाकरे म्हणाले,  नॉन-कोविड रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दवाखाने खुले ठेवा. सर्दी खोकला ताप असे कोणतेही लक्षण लपवू नका, कोणी आपल्याला वाळीत टाकण्याची भीती बाळगू नका, घरी उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्ध बरे होतात . महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले. ज्यातील जिल्ह्यांच्या सीमा 3 मे पर्यंत बंद  आहेत. 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम आहेत.  80 ते 90 टक्के जनतेपर्यंत रेशन पोहोचले, केंद्राची मदत होत आहे. केंद्र मोफत धान्य देत आहे पण फक्त तांदूळ आला आहे, तोही अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या जनतेसाठी, डाळ आणि गव्हाची मागणी केली आहे.


वृत्तपत्र बंदी नाही


वृत्तपत्रावर बंदी नाही, पेपर स्टॉलवर बंदी नाही. घरोघरी पत्र टाकू नये असं मला वाटत आहे. महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कृपा करून आरोग्यविषयक आणीबाणी आहे यामध्ये मला धोका घ्यायचा नाही. मुंबई आणि पुणे सारख्या ठिकाणी संकट संपवायचं आहे.


संबंधित बातम्या :