कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कसबा सांगावमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. पहाटे ३च्या सुमारास ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. पती प्रल्हाद आवळे यांने चारित्र्यावरील संशयातून पत्नीच्या धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी पतीला तात्काळ अटक केली. आरोपी प्रल्हाद आवळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.