उस्मानाबाद : तुळजापूरच्या तुळजाभवनी मंदिराने मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावर 24 तासांत यू टर्न घेतला आहे. मंदिरात पूर्वीप्रमाणे मांसाहारी नैवेद्य सुरु होणार असून मंदिराच्या पासवर चुकीचा उल्लेख झाल्याची कबुली व्यवस्थापकांनी दिली आहे.


तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांनी कालच (रविवार) मंदिरात यापुढे मासांहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही, असा आदेश दिला होता.

तसंच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी प्रवेश पास अनिवार्य केला आहे. त्यामुळे पासशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून पास घेणं आवश्यक आहे. त्या पासवर मांसाहारी पदार्थ नेऊ नयेत असं लिहिलं होतं.

खरंतर नवरात्रीमध्ये तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो. तर दसऱ्याला बोकडाचा बळी देण्याची प्रथाही आहे.

संबंधित बातमी

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य