मनमाड : पिस्तुलचा धाक दाखवत स्वता:च्याच पत्नीवर मनाविरुध्द अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. या प्रकरणाची फिर्याद पिडीत विवाहित तरुणीने मनमाड पोलिसात दाखल केली असून पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अभिजीत आडकेशी असं या आरोपीचं नाव असून सध्या आंबेजोगाई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी आरोपी अभिजीत आडकेचं मनमाड शहरातील पिडीत तरुणीशी विवाह झाला. लग्नानंतर काहीतरी कारण सांगत तिला महिनाभर माहेरी ठेवले. त्यानंतर तो तिला आंबेजोगाईला घेऊन गेला.
आंबेजोगाईला गेल्यावर पिडीत तरुणीला आपल्या पतीच दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे कळाले. या प्रेमसंबंधाविषयी पुरावे मिळाल्यानंतर पिडीत तरुणीने याविषयी अभिजीतला विचारणा केली. सुरवातीला टाळाटाळ करणाऱ्या पतीने अखेर आपले विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याची कबूली दिली. त्यानंतर मात्र अभिजीतने पिडीत तरुणीचा मानसीक छळ सुरु केला.
आरोपी अभिजीत आडके गाडी घेण्यासाठी पिडीत तरुणीकडे माहेरुन 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. सासू-सासरे आणि दिर ही तिचा छळ करु लागले. शाररीक संबंधाला नकार दिल्याने तिच्या डोक्याला सर्विस रिव्हॉल्वर लावत त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
पिस्तुलचा धाक दाखवत पोलिस फौजदाराचा स्वत:च्याच पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2018 08:59 AM (IST)
सुरवातीला टाळाटाळ करणाऱ्या पतीने अखेर आपले विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याची कबूली दिली. त्यानंतर मात्र अभिजीतने पिडीत तरुणीचा मानसीक छळ सुरु केला.
प्रतिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -