Chhatrapati Sambhajinagar: निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जोरदार राडा केला. निकृष्ट जेवणं दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. त्यांनतर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं प्रकरण काय? या कॅन्टीनचं कंत्राट कोणाला दिलं जातं? हे कॅन्टीन चालक दक्षिण भारतीय आहेत का? अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पाहूयात ..
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad Canteen Video) यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण अंजता कॅटर्स हे अनेक वर्षांपासून ते कॅन्टीन चालवत आहेत. मुदत संपल्यानंतर ही पाच वर्षांपासून हे कॅटर्स का सुरु आहे. त्यामुळे नियमांना बगल देत अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय असलेल्या कॅटर्सवर सरकार मेहरबान असल्याचं बोललं जात आहे.
आमदार निवासाच्या कॅन्टीनचं कंत्राट कोणाकडे?
या कॅन्टीनचं कंत्राट ‘अजंठा केटरर्स’ या कंपनीकडे असून ती गेल्या सात वर्षांपासून हे कॅन्टीन चालवत आहे. याच ठिकाणी कार्यरत असलेल्या योगेश पुर्तन या मॅनेजरला आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. अजंठा केटरर्सचे मालक जयराम बी. शेट्टी हे मुंबईतील असून त्यांच्या ताब्यात इतरही शासकीय कॅन्टीन कंत्राटे आणि हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय आहेत. आकाशवाणी आमदार निवासाबरोबरच मनोरा आमदार निवासाचे कॅन्टीन कंत्राट देखील अजंठा केटरर्सकडे होतं. 2018 मध्ये मूळ कंत्राटाची मुदत संपल्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती, आणि त्यामुळेच अजंठा केटरर्स सातत्याने गेल्या सात वर्षांपासून कॅन्टीन चालवत आहे.
या कॅन्टीनमध्ये काम करणारे कर्मचारी हे काही दक्षिण भारतातून आलेले आहेत, तर काही महाराष्ट्रातील स्थानिक आहेत. यामधील योगेश पुर्तन हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो मूळचा दक्षिण भारतातील असून, घटनेनंतर त्याला आपल्या गावी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अजूनतरी कॅन्टीन मालकांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाची दिशा काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा: