औरंगाबाद: औरंगाबादचं मध्यवर्ती झेडपी मैदान, मैदानावर दीडशे दुकानांची रांग, दुकानांभोवती शेकडो लोकांची गर्दी आणि एक ठिणगी! औरंगाबादमध्ये कोट्यवधींचा कोळसा झाला. पण त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.


एकीकडे लोकांचा रोष पालिकेवर आहे. तर दुसरीकडे पालिका आयुक्त मात्र आयोजकांच्या नियोजनावर शंका घेत आहेत.

आयोजकांना सांगितलं होतं की, सेफ्टी मेजर्स घ्या. पण त्यांनी ते घेतले नाही. त्यामुळे आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया औरंगाबाद महापालिका ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

फटाका बाजाराचं आयोजन करताना काय करणं गरजेचं?  

- फटाकेविक्री रहिवासी भागापासून दूर असणं गरजेचं आहे.

- दुकानं रिकाम्या मैदानांमध्ये उभी करावी.

- फटाके विक्रेत्यांनी विक्रीसाठीचा परवाना पालिकेकडून घ्यावा.

- फटाके विक्रीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा तैनात असावी

- ज्वलनशील पदार्थांपासून फटाका बाजार लांब असावा

पण औरंगाबादमध्ये या नियमांचं पालन झालं का? असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.

औरंगाबादच्या झेडपी मैदानात काय झालं? सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत का? पालिकेनं दुर्लक्ष केलं का? आयोजकांनी हलगर्जीपणा केला का? याची उत्तरे शोधावी लागणार आहेत. कारण ही उत्तरंच समोर आणणार आहेत या अग्नितांडवाचं खरं कारण!

संबंधित बातम्या:

औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली

VIDEO : औरंगाबादमधील अग्नितांडवाची एक्स्लुझिव्ह दृश्यं

अग्नितांडव : औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?