तुकाराम मुंढेंबाबत कायदा पाळूः मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2016 01:51 PM (IST)
मुंबईः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावर कायदेशीर प्रक्रिया होईल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच मौन सोडलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल तुकाराम मुढेंच्या अविश्वास प्रस्तावावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्री कायद्याचं पालन करत नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं होतं. उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे होईल, असं स्पष्ट केलं. तुकाराम मुंढेंवर भाजप वगळता सर्व नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला आहे. तसेच मुंढेंची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. तुकाराम मुंढेंनीही आपण इथे आहोत तोपर्यंत नेहमीप्रमाणेच काम करणार, असं यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्याः