साताराः सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीआधी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन तुटलं आहे. त्यामुळे दोघेही येत्या निवडणुकीत वेगळी चूल मांडणार आहेत.


मागच्या निवडणुकीत दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी जागांच्या तिढ्यावरुन हे मनोमिलन तुटलं, असं बोललं जात आहे. मात्र उदयनराजेंनी एकतर्फी विजय मिळवू असं आव्हान दिलं आहे.

नगरपालिकेतील 40 पैकी 40 जागा मिळवून एकतर्फी विजय साजरा करु, अन्यथा खासदारकीचा राजीनामा देऊ, असं आव्हान उदयनराजेंनी दिलं आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता आणखीच वाढली आहे.