Shahaji Patil : सध्या महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. गेल्या सहा दिवसापासून एकनाथ शिंदे जवळपास 40 हून अधिक आमदारांसह गुवाहटीत दाखल झाले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल चांगलीच झाली आहे. या 40 आमदारांमध्ये शहाजी पाटील हे देखील आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' अशा प्रकारचं शहाजी पाटील यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हे शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण? त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे, याचा एक आढावा....
शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियात त्यांच्या नावाच सध्या ट्रेण्ड आहे. गुवाहटीत पोहोचलेल्या शहाजीबापू पाटील यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला आणि शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं.
शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?
- शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार
- विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
- 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
- 1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
- त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
- 1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
- त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
- त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
- 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
- 2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले
अशी आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळं ते त्यांच्या संभाषणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे होणार असल्याचे म्हणत आहेत. फडणवीसांचे आणि माझे नाते हे भाव-भावासारखे आहे, तर शिंदेसाहेब मला मुलाच्या नजरेनं बघतात असेही पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या: