Pune NIA Adnan ali : एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असं या डॉक्टरचं नाव आहे. हे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. कोंढवा परिसरात ते भूलतज्ञ होते. तरुणांना ISIS ची माहिती देऊन त्यांना ISISच्या जाळ्यात अडकवण्याचं काम करत होता.
नेमका कोण आहे अदनान अली?
एनआयएने अटक केलेले अदनान अली सरकार हा मूळचा बोहरी मुस्लिम होता. त्याच्या वडिलांचे बोहरी आळीत नट बोल्टचे दुकान होते. मात्र अदनान अली सरकार याने डॉक्टर झाल्यानंतर सुन्नी पंथ स्वीकारला. त्यानंतर धार्मिक व्याख्याने देऊ लागला. काही धार्मिक पुस्तके त्याने लिहिली आहेत. एनआयएने याच प्रकरणात कोंढव्यातून अटक केलेला जुबेर नुर मोहम्मद शेख हा सरकार याच्या लहान भावाचा मेहूणा आहे.
एमबीबीएसचे शिक्षण, भूलतज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी अन्..
मुस्लिम तरुणांना ISIS कडे आकृष्ट करण्याचं काम तो करत होता, असा एनआयएचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसीसचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. अदनान अली सरकार याने पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनिस्थेटीस्ट अर्थात भुलतज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवली. पुण्यातील नोबेल, सिंहगड यासारख्या हॉस्पीटल्समधे तो भुलतज्ञ म्हणून 16 वर्षांपासून काम करत होता.
एकाच रस्त्यावर जगभरात कार्यरत असलेल्या ISIS च्या उपसंघटना
कोंढव्यातील एका सोसायटीत डॉक्टर अदनान अली सरकार रहात होता. इथून काही अंतरावर एटीएसने अटक केलेले मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ रहात होते तर तिथून जवळच पीएफआय या दहशतवादाचा आरोप असलेल्या संघटनेचे कार्यालय होते. कोंढवा भागातील एकाच रस्त्यावर जगभरात कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या अर्थात इसीसच वेगवेगळ्या उपसंघटना काम करत होत्या हे आता स्पष्ट झालं आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच जण दहशतवादी कारवाई करण्याचा कट रचत होते. त्यात ISIS बरोबरच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (ISIS-K) या संस्थांचादेखील समावोश होता.
हेही वाचा-