सातारा : महिला दिनाच औचित्य साधून साताऱ्यातील एका गावानं एक उपक्रम राबवला. पण या उपक्रमाने गावातील पुरुष मंडळींच्या डोक्याला ताप झालाय अस म्हणायची वेळ आलीय. एरव्ही महिलांकडून केल्या जाणाऱ्या कामांना दुय्यम लेखण्याची अनेक महाभागांना सवय असते. मात्र काल महिला दिनाच्या निमित्तानं नवरोबांनी घराच्या चुलीचा ताबा घेतला. तेव्हा त्यांची झालेली दमछाक पाहण्यासारखी होती.


सातारा जिल्ह्यातील निसराळे गावातील लोकांनी महिल दिनाच औचित्य साधून आख्या गावातील महिलांना सुट्टी दिली. तोंडी नाही तर लेखी. तेही ठराव करुन उपक्रम राबवला गेला. दिवस उजाडला आणि बैल जुपांवा तसा घरातील पुरुष कामला जुपला गेला.

VIDEO | साताऱ्यातील निसराळेत महिला दिनाची धमाल | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



पुरुषांना कामं करत बघून शेजार पाजारची बायका-पोर हसत होती. आख्या गावात नुसती धम्माल चालू होती. काही ठिकाणी तर बायको नवऱ्याला दम ही देत होती. तर काही ठिकाणी बायका मुद्दामच भांडी वाढवून नवऱ्याकडून घासून घेत होती. पण यातचं पुरुषांना नको नको झाल होत मात्र आपल्या बायकांना एक दिवसाची सुट्टी दिल्याचा आनंदही त्यांना होता.

एमएसडब्लूच्या विद्यार्थांमुळे ही संकल्पना गावात आली आणि ही विद्यार्थांची संकल्पना गावाने स्विकारली. या सगळ्या पुरुषांच्या कामामुळे महिलांना
काहीकाळ निवांतपना मिळाला होता.