एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/09/2017
1. जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंचं अहमदाबादमध्ये जोरदार स्वागत, पहिल्यांदाच दोन पंतप्रधानांचा खुल्या जीपमध्ये रोड शो, उद्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ https://goo.gl/HBgtsW
2. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपुढे राज्य सरकार नरमलं, बुलेट ट्रेनसाठी मुंबईतील बीकेसीची 0.9 हेक्टर जमीन देण्यास फडणवीस सरकारची मान्यता https://goo.gl/bAV6GD बुलेट ट्रेन आणि गिफ्ट सिटीमुळे मुंबईचं महत्व कमी होण्याची भीती https://goo.gl/mr5jEX
3. परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी 6 महिने थांबण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/Mmv5gw
4. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार कमबॅक, दिवसभरात पावसाची उसंत, मात्र उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला दिलासा https://goo.gl/n64eCE
5. मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अन्य चार सदस्यांचा समावेश https://goo.gl/aBmWn9
6. नांदेड महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, भाजपला मतदान करण्याचं शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं जाहीर आवाहन https://goo.gl/4L2VqJ
7. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज, सर्वाधिक अर्ज बीड जिल्ह्यातून https://goo.gl/yW25P4
8. तेजसनंतर कोकणवासियांना सलग दुसरं गिफ्ट, अत्याधुनिक विस्टाडोमचे पारदर्शक डबे दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडणार https://goo.gl/drdPqX
9. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत अवजड वाहनांना पिक अवरमध्ये नो एन्ट्रीचा प्रस्ताव, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न https://goo.gl/b4pBmV
10. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी, हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ https://goo.gl/Ghk4zr
11. दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अभाविपला झटका, चार वर्षानंतर काँग्रेसच्या NSUI चा अध्यक्ष बनणार https://goo.gl/73yzyx
12. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका, लंडनमधील दाऊदची अब्जावधींची संपत्ती ब्रिटिश सरकारकडून जप्त https://goo.gl/SnZLdX
13. अयोध्याप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य असेल, सरसंघचालक मोहन भागवतांचं स्पष्टीकरण https://goo.gl/hkzY6u
14. कॉमिक बुकमधला सुपरहिरो आता मोठ्या पडद्यावर, रितेश देशमुख निर्मित फास्टर फेणेचा टीझर लॉन्च http://abpmajha.abplive.in/
15. 2007 विश्वचषक हा फार वाईट काळ होता, पण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरु झाला, सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपच्या आठवणींना उजाळा https://goo.gl/GH3dPM
माझा विशेष : बुलेट ट्रेनच्या निमित्ताने गुजरात आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र बनतंय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर
आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X चे नेमके पण खास फीचर https://goo.gl/Ssde68
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर