श्राद्धाला हास्याची कारंजी, मलारा कुटुंबाचा अनोखा पायंडा
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 13 Sep 2017 04:17 PM (IST)
मलारा कुटुंबानं त्यांच्या मित्रांना, आप्तेष्टांना हास्य क्लबचं निमंत्रण दिलं. यावेळी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी आणि बरेच जळगावकर उपस्थित होते.
जळगाव : जळगावच्या मेहरुण तलावाकाठी सकाळी-सकाळी हास्याची कारंजी फुलली होती.. निमित्त होतं श्राद्धाचं.. श्राद्ध असूनही हास्यविनोद रंगण्याचं कारण वेगळंच आहे. सुंदरलाल मलारा यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांना रडणं मुळीच पसंत नव्हतं. वृद्धापकाळातही ते हास्य क्लब चालवायचे. विज्ञानवादी असलेल्या सुंदरलाल यांचा पितर आणि कावळ्यांच्या शिवण्यावर विश्वास नव्हता. सुंदरलाल यांना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे आज मलारा कुटुंबानं त्यांच्या मित्रांना, आप्तेष्टांना हास्य क्लबचं निमंत्रण दिलं. यावेळी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी आणि बरेच जळगावकर उपस्थित होते.