मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या 5 सदस्यीय उपसमितीचे अध्यक्ष आहेत.


या समितीत शिवसेना नेते दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप

मुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाने अखेरचा मूक मोर्चा काढत, आरक्षणाची मागणी केली होती. राज्यभरात मराठा समाजाने अनेक भव्य मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली आहे.

मुंबईतील मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटलं होतं. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप

मराठा मोर्चा : मागण्या काय आणि मिळालं काय?

संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले!

असा मोर्चा कधी पाहिलाय का?

 मुंबई मराठा मोर्चा: तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं!

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी