मुंबई : केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील रेल्वेसाठी 1 हजार 168 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात 584 कोटी रुपये केंद्र सरकार तर 584 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.


मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्ससाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आर. एस. खुराना यांनी यासंदर्भातील माहिती दिली. वांद्रे स्टेशन हेरिटेज स्टेशन व्हावे म्हणून यासाठी विशेष निधीचीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.


अंधेरी ते विरार मार्गावर 15 डब्यांच्या गाड्या चालवल्या जाव्या यासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या पूर्ण प्रोजेक्टसाठी 59.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेला एकूण 7672 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये प्रवासी सुविधेसाठी 280 कोटी मिळाले आहेत. गेल्यावर्षी हा निधी 244 कोटी होता. नवीन मार्गिकांसाठी 403 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हा निधी 281 कोटींचा होता.


अर्थसंकल्पातून मुंबई रेल्वेला काय मिळालं?




  • कल्याण-आसनगावदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका

  • कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका

  • विरार-वसई-पनवेलदरम्यान नवीन उपनगरीय मार्गिका

  • कळवा-ऐरोलीदरम्यान नवीन मार्गिका

  • गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार

  • चर्चगेट-विरारदरम्यान धीम्या मार्गावर वातानुकूलित लोकल कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंन्ट्रोल सिस्टिम

  • सीएसटी-पनवेलदरम्यान उन्नत मार्ग

  • विरार ते डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका

  • पनवेल कर्जत दरम्यान नवीन रेल कॉरिडोर


 

संबधित बातम्या 


अर्थ बजेटचा : पियुष गोयल यांच्या पोतडीतून रेल्वेला काय मिळालं?


अर्थ बजेटचा : पियुष गोयल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


'पाच लाखा'चं करमुक्त उत्पन्न आणि फुस्स झालेला फुगा


अर्थ बजेटचा : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उसळी


अर्थ बजेटचा : मध्यमवर्गीयांना दिलासा, पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त


अर्थसंकल्प 2019 : छोट्या शेतकऱ्यांना दिलासा, वर्षाला 6 हजार रुपये मिळणार


अर्थसंकल्प 2019 : 60 वर्षांवरील कामगारांना पेन्शन मिळणार


अर्थ बजेटचा : संरक्षण खात्यासाठी 3 लाख कोटींची तरतूद