Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  त्यानंतर शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भूमिकादेखील स्पष्ट केली मात्र याच पत्रकार परिषदेत शरद पवारांनी दिलेल्या एका उत्तराची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरदेखील याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे व्हिडीओ ट्विट केले आहे. 


अजित पवारांच्या बंडानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडीमार सुरु होता. शरद पवार शांतपणे सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा राग किंवा चिंता दिसली नाही. शांतपणे सगळ्या प्रश्नांची विचार करुन उत्तरं देताना बघायला मिळालं. याचवेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. आमदार आणि अजित पवारांनी बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीत कोणता चेहरा आश्वासक वाटतो?, त्यावर शरद पवारांनी एकाही क्षणाचा विलंब न करता थेट  हात वर करुन 'शरद पवार', असं उत्तर दिलं. हे उत्तर शरद पवारांचा खंबीरपणा दर्शवतो, असं बोललं जात आहे. या व्हिडीओ रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. त्यात बस नाम ही काफी है, असं कॅप्शन दिलं आहे. अजित पवारांची शपथविधी सुरु असताना रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबतच पुण्यातील निवासात होते. 






'काही लोकांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली'


आमच्या लोकांनी पक्षाची जी भूमिका आहे त्यापेक्षावेगळी भूमिका घेतली. 6 जुलैला मी पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संघटनात्मक बदल करण्याचे जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याचा विचार करणार होतो. जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यापूर्वीच काही लोकांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत हे मांडले. पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचे चित्र आणखी दोन - तीन दिवसात लोकांसमोर येईल. त्याचे कारण ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी आज माझ्याशी संपर्क साधला आणि आम्हाला यातील काही कल्पना नाही. आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे ती कायम आहे. याचा खुलासा माझ्याकडे केला आहे. यावर मी आताच काय बोलू इच्छित नाही याचे स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यावर माझा विश्वास बसेल आणि मांडले नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन असेही शरद पवार म्हणाले.





हेही वाचा:


Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली