सांगलीः राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांचं इस्लामपूरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी इस्लामपूरमधील सदाभाऊ यांच्या घरी जिल्ह्यातील अनेक कार्यकत्यांनी गर्दी केली होती.


 

इस्लामपूरमधील प्रमुख रस्त्यांवरून यावेळी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सदाभाऊ यांनी मरळनाथपुर या आपल्या मूळ गावी भेट दिली. घरोघरी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले.