पुणे: राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधून होतात, त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही, असे सांगून अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, ''इतर पक्षांप्रमाणे आम्हाला शहराचे निर्णय घेण्यासाठी केंद्रात किंवा राज्यात जावे लागत नाही. जनता शहराचा विकास बघत आहे. त्याला ती योग्य न्याय देईल.''
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होत आहे त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, आज राज्यात व केंद्रात सरकार असून ही त्यांना इथे मात्र राष्ट्रवादी विरुद्ध लढण्यासाठी ते हतबल असावेत म्हणून युती केली असेल. राम शिंदे आणि महादेव जाणकार अशा दोन धनगर समाजाच्या व्यक्तींना मंत्रिपद दिले त्याचा आनंद होतो आणि दोन तीन महिन्यात आरक्षण मिळवून घेतील आणि आरक्षण मिळाले नाही तर ते बाहेरही पडेल दुधाला किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल अशी आहे. अशी टीकाही अजित पवारांनी यावेळी केली.