मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात पंकजा मुंडे यांना मोठा झटका मिळालाय. त्यांचं जलसंधारण खातं काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडेंची नाराजी ट्विटरवर पहायला मिळाली.


 

सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजांनी आता मी जलसंधारण खात्याची मंत्री नसल्याने या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्वीट केलं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नव्हे तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहा, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.



दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या आदेशाची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात रिप्लाय येताना दिसत आहेत.