Weather Update Today : पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालयीन भागात 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. आयएमडीनुसार, महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थानसह (Rajsthan) देशाच्या अनेक भागात पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला आहे. हवामान विभागाच्या (Weather Update Today) माहितीनुसार, 24 तासांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. त्यामुळे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल.


उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर ढग दाटून आले आहेत. यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीसाठीची पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आयएमडीचा अंदाज पाहता, राजधानी दिल्लीत पुढील 24 तासांत गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


आज आणि उद्या पावसाची हजेरी


येत्या काही दिवसात आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय होणार आहे. त्यामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात ताशी 40-60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


एप्रिल, मेमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज


दरम्यान, एकीकडे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असताना मुंबईसह पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात तापमानात वाढ दिसून येईल. शिवाय, एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी


31 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ईशान्य भारतात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या (IMD) माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तर-पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vidarbha Weather Update: राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार; तर 'या' दिवशी पुन्हा अवकाळी ढग