Weather News : ऑक्टोबर (October) महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमाल तापमानात वाढ (temperature increase) होणार आहे. या महिन्यात 'ऑक्टोबर हिट' चा अनुभव येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. महाराष्ट्रात देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, ऑक्टोबर हिटचे चटके बसणार आहेत. 


देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. देशात जुलै आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. देशात नैऋत्य मान्सूनमध्ये एकूण सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. आत्तापर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  एकूण सरासरीच्या 96 टक्के पाऊस झाला आहे. 


महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस 


महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी आयएमडीनं दिलेला अंदाज चुकला आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय हवामान विभागानं सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पॉझिटिव्ह आयओडीमुळं सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात विदर्भातही काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


आज या भागात ऑरेंज अलर्ट


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकण (Konkan weather ) आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra rain) आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg ) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ


कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या समुद्र खवळलेला असल्याने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update: पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, कोल्हापूर, कोकणला ऑरेंज अलर्ट