मुंबई : महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave Alert) इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 एप्रिल रोजी राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Heat Wave Yellow Alert) देण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 3 मेपासून पुन्हा राज्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट 


पुढील 24 तास महत्त्वाचे असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान विभागाने, पुढील 24 तासात राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या लाटेला इशारा दिला आहे. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड या भागात तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.






काही भागात कोरडं वातावरण


उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही दमट आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता


एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


अवकाळीचं संकट! आंबा, भात शेतीचं नुकसान, गारांच्या पावसाने टोमॅटो सडला