पुणे : पुण्यात सकाळपासून पावसाने ( Rain) जोर धरला आहे. पुण्यातील विविध भागात सकाळपासून  पावसाला ( weather forecast) सुरुवात झाली आहे. पुण्यातील (Pune rain update) विविध परिसरात पाऊस पडत आहे. कोथरुड, डेक्कन, नळ स्टॉप, स्वारगेट, जंगली महाराज रोड, कात्रज या परिसरात पाऊस पडत आहे. या पावासमुळे सकाळीच पुण्यातील विविध भागात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं.  पुणेच नाही तर राज्यभर 48 तास पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

Continues below advertisement


राज्यात 48 तास पावसाचे...


अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाध्यावर अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तास राज्यातील काही भागात पाऊस सक्रिय तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील संपूर्ण भागात मेघगर्जनेसह विजांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


पुण्यात वातावरण कसं असेल?


9 सप्टेंबर : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. मध्यम स्वरूपाचा तीव्र सरी, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


10 सप्टेंबर : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


11 सप्टेंबर : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


12 सप्टेंबर : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


13 सप्टेंबर : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


14 सप्टेंबर : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


पुण्यातील धरणाची स्थिती काय?


पुणे जिल्ह्यातील चार धरणात एकूण 93.13 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात खडकवासला 47.07 टक्के, पानशेत 99.41टक्के , वरसगाव 99.10टक्के , टेमघर धरण 80.03 टक्के पाणीसाठा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


IMD Weather Update : विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय, देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज