Weather News : सध्या राज्यातील हवामानात मोठा बदल (Climate Chnage) होताना दिसत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावलीय. आता पडलेल्या अवकाळी पावसाचा काही शेती पिकांना देखील फटका बसलाय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील थंडी सध्या परतीच्या वाटेवर आहे. परवापासून म्हणजे 13 फेब्रुवारीपासून राज्यातील  थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता 


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेचं किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भासह मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता


पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर  यांनी देखील राज्यातील हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. याशिवाय सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


वर्धा जिल्ह्यात गारपीट, शेती पिकांना मोठा फटका


वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या विजयगोपाल आणि तांबा गावात जोरदार गारपीट झाली आहे. लिंबाच्या आकाराच्या गारपिटीने जनावरे जखमी झाली आहेत. यामुलं शेतातील हरभरा, गहू, तूर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.  यामुळं शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. वर्धा जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वर्ध्यात सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान देवळी तालुक्यात  वादळ वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहेय. विजयगोपाल, तांबा,आकोली, लोणी या परिसरात तब्बल अर्धा तासाच्या वर गारपीट झाली आहे.  लिंबाच्या आकाराच्या गारपिटीने जनावरे जखमी झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. गारपिटीच्या गारांचे थर गोठ्यात साचले आहेत. वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्यानं ग्रामीण भागातील 10 ते 12 गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. देवळी तालुक्यातील विजयगोपाल आणि तांबा गावात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. गारपिटीनं चणा, गहू, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा गारपिटीने चिंतेत पडला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : आजही राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता, पुढील 3 ते 4 दिवस 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा