Maharashtra Weather Update : आजही राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain In Maharashtra) शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागात थंडी आता गायब होऊ लागली असून आता उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, शनिवारी राज्यातील विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. याशिवाय सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे.
सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे
राज्यातून थंडी परतीच्या वाटेवर
महाराष्ट्रातील काही भागात थंडी आता गायब होऊ लागली असून आता उकाडा जाणवू लागला आहे. आजही राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. राज्यातून थंडी परतीच्या वाटेवर असून 13 फेब्रुवारीपासून थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता
आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हयात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
गेल्या काही महिन्यांपासून निसर्ग चक्रातील बदलाने शेती आणि शेतकरी सापडले असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे.