मुंबई : सध्या राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आधीच उशिरा सुरु झालेला मान्सून लांबीवर लांबणीवर पडल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र 18 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक शुभांगी भूते यांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार पाच दिवस अजून पाऊसाची वाट पहावी लागेल असं मतं शुभांगी भूते यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील पावसाची सरासरी

कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मध्य महाराष्ट्र सरासरी पेक्षा साधारण

मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा सर्वच जिल्हात कमी पाऊस झाला

पालघर,पुणे, मुंबई येथे सरासरी पेक्षा जास्त पाऊस

नाशिक ठाणे रायगड सातारा कोल्हापूर येथे सरासरी इतका पाऊस जुलै १४ तारखे पर्यंत पाऊस झाला.

उत्तर महाराष्ट्र ही सरासरीपेक्षा कमी पाऊस आता पर्यंत झाला

नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, परभणी, अकोला वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा गोंदियात जिल्हात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस

Marathwada Vidarbha | मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसल्याने भाजीपाल्याने भाव वाढले | उस्मानाबाद | ABP Majha



कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्याने रत्नागिरीतल्या महत्त्वाच्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहताहेत. जगबुडी आणि वशिष्ठी नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडल्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजपेर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प होती. मात्र दुपारनंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. दरम्यान मुसळधार पावसामुळं खेड,चिपळूण आणि इतर परिसरातल्या घरांमध्ये आणि बाजारामध्ये पाणी शिरलं होतं.

Konkan Rain | चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, बाजापरेठ, घरांमध्ये पाणी | ABP Majha