चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेले पांढरकवडा शेतशिवार आज एका घटनेने ढवळून निघाले. एका प्रेमी युगुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. यातील दोघेही विवाहित असल्याने प्रकरणातील गूढ वाढले आहे.
पांढरकवडा गावाच्या शेत शिवारात ही घटना उजेडात आली असून एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत हे मृतदेह आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. यातील युवक नागपूर तर युवती घुग्गुस येथील आहे.
दरम्यान घुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे मृतक दोघेही विवाहित आहेत. दोघांनाही आपापली स्वतंत्र कुटुंबे आहेत. या दोघांची नागपुरात ओळख झाली त्यानंतर परिचयाचे प्रेमात रूपांतर झाले, असल्याची माहिती मिळाली आहे.
काल रात्री मृत युवक चंद्रपुरात होता. दोघांची चंद्रपुरात भेट देखील झाली. नंतर रात्री 10.30 वाजता राजेश आपल्या दुचाकीने घटनास्थळी पोचला. त्याने सुनीताला बोलावले आणि नंतर दोघांनी गळफास घेतला, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृत युवकाची दुचाकी घटनास्थळी आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.
चंद्रपुरात झाडाला लटकलेल्या स्थितीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2019 04:30 PM (IST)
पांढरकवडा गावाच्या शेत शिवारात ही घटना उजेडात आली असून एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत हे मृतदेह आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. यातील युवक नागपूर तर युवती घुग्गुस येथील आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -