नाशिक : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू असा इशारा नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा  खाजगी डॉक्टर्सला दिला आहे.  कोरोनामुळे सुरु असलेल्या मृत्यूतांडवात रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स हताश झाले आहेत. नाशकातील 172 रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना  पत्र लिहून कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर  खाजगी डॉक्टरशी चर्चा करणार असून  तोडगा निघाला नाहीतर करावाई करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला. 


महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले,  हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनचा निर्णय ऐकतर्फी आणि चुकीचा आहे. सर्व हॉस्पिटलला महानगरपालिका परवाना देत असते. सेवा देणं हे प्रत्येकाच कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देण्याअगोदर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्याकडे समस्या न मांडता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आज खाजगी डॉक्टरशी चर्चा करणार तोडगा निघाला नाहीतर करावाई करणार येईल.


नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावं, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अशातच राज्य सरकार यावर काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


एबीपी माझानं या पत्रासंदर्भातील आरोग्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांच्यापर्यंत हे पत्रच पोहोचलं नव्हतं. पण तरिही आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर्स असं काहीही करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला होता. अशातच खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी लिहिलेल्या पत्रामागील कारण त्यांनी नमूद केलेलंच आहे की, गेल्या काही दिवसांपासून नाशकातील अनेक रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे यातून निराश होऊन हे पत्र लिहिलेलं आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


संबंधित बातम्या :


कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा; नाशकातील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र