Aaditya Thackeray : लाडकी बहिण योजनाला आम्ही आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्काम देऊ, पण लाडका कॉन्ट्रॅक्टरबाबत कोणी बोलत नाही. बजेट मॅनेजमेंट हा भाग पाहायला हवा, राज्य सरकार बरखास्त झाला पाहिजे ही परिस्थिती आली असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीचे काय केले?
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीचे काय केले? अनेक योजना जाहीर झाल्या, जाहिराती येतात पण पुढे काही होत नाही. एकमेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेल चालणारी लोक असताना काय होऊ शकते हे दिसले, अशी टीकाही त्यांनी केली. कोस्टल रोडवरून बोलताना ते म्हणाले की, एक वर्ष उशीर खोके सरकारने लावला आहे. डिसेंबर 2023 ही डेड लाईन दिली होती. तसे काम झाले होते. वेळ वाढवून मिळतो, पण पुढे काय होत नाही. कितीवेळा कोणत्या भागाचा कालावधी वाढवून घेतला आहे? ते चेक करायला हवे, असे ते म्हणाले.
होर्डिंग्ज आम्हील लावू देणार नाही
आदित्य यांनी सांगितले की, होर्डिंग्ज आम्ही लावू देणार नाही. डिसेंबरला आमचे सरकार बसले असेल. आम्ही एक पण होर्डिंग्ज कोस्टल रोडला लावू देणार नाही. होर्डिंग्जबाबत नवी पॉलिसी आम्ही आणणार आहोत. कसेही होर्डिंग्ज लावू लागले आहेत. लोकांना त्रास होऊ लागला आहे. लोकांच्या घरातील लाईट जाऊ लागले आहेत. झोप येणं कठीण झालं आहे. आमच्या सरकारच्या वेळी काही लोकांना झोप यायची नाही, हुडी वगैरे घालून ते रात्री जायचे तसे लोकांचे झाले असल्याची टीका त्यांनी केली.
पुन्हा म्हणणारे कोणी येणार नाही
महाराष्ट्रातील निवडणूक लांबण्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न होत आहे पुन्हा, पुन्हा. पण पुन्हा म्हणणारे कोणी येणार नाही. सरकारमध्ये बसणार नाही.
कॉन्ट्रॅक्टर यांचा लडका आहे का?
मुंबई नाशिक हायवेवर का कारवाई करत नाही कॉन्ट्रॅक्टर यांचा लडका आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली. मुंबई गोवा, मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे मुक्त करू शकले नाहीत, त्यांनी रस्त्यांचा घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या