Someshwar Cooperative Sugar Factory : बारामती (Baramati) तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं (Someshwar Cooperative Sugar Factory) मोठा विक्रम केला आहे. मागील 2023-2024 गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना ठरला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपीपेक्षा (FRP) प्रति मेट्रीक टन ऊसाला 697 रुपये जास्त दर सोमेश्वर कारखान्याने दिला आहे. त्यामुळं अनुदानासह शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन दर हा 3771 रुपये दर जाहीर केलाय. सर्वात जास्त दर देणारा सोमेश्वर साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-2024 साठी ऊसाला प्रती टन अनुदानासह 3771 रुपये दर जाहीर केलाय. एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त दर देण्यात आला आहे. अशा प्रकारे जादा दर देणारा सोमेश्वर राज्यात पहिलाच कारखाना ठरल्याची माहिती माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलीय. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्यावर असणारे लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखू शकला, अशी माहिती जगताप यांनी दिलीय.
5 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन ऊसाचे गाळप
कारखान्याने गत हंगामासाठी 3571 रुपये उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. सभासद व बिगर सभासदांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 75 रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 100 रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसास 150 रुपये व नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. अनुदानासह जानेवारीमध्ये तुटलेल्या उसास 3646 रुपये, फेब्रुवारीमधील उसाला 3671 रुपये, मार्चसाठी 3721 रुपये दिला गेला आहे. तर मार्चनंतर तुटलेल्या ऊसाला 3771 रुपये दर जाहीर केलाय. गत हंगामात सोमेश्वरने एकूण 15 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, बी हेवीसह सरासरी 12.21 टक्के साखरउतारा राखत 18 लाख 26 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. गत हंगामाची एफआरपी 2 हजार 873 रुपये होती. त्यापैकी आजवर 3 हजार 100 रुपये दिले आहेत. पुढील महिन्यामध्ये 100 ऊस प्रोत्साहन अनुदान हे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आमचा अंतिम दर हा मेरीटवर ठरतो : पुरुषोत्तम जगताप
मागील हंगामात ऊसाची कमतरता होती. या काळात देखील 15 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. आमच्या कारकान्याची रिकव्हरी ही 12.21 आहे. कारखान्यावर डिस्टलरी प्रोजक्ट, को जनरेशन आहे. तसेच साखर विक्रीला देखील चांगला दर मिळाला, त्यामुळं आम्हाला शेतखऱ्यांना चांगला दर देणं शक्यत झाल्याचे सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितलं. आम्ही इतर कोणत्याही साखर कारखान्यांशी स्पर्धा करत नाही. आमचा अंतिम दर हा मेरीटवर ठरतो असे जगताप म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदांदा यांच्या मार्गदर्शनालाखाली योग्य नियोजनाद्वारे काम करत असल्याचेही ते म्हणाले. आमचा साखर कारखाना हा साडेसात हजार मेट्रीक टनाने चालतो. तसेच २३ मेगावॅटची वीज निर्मिती होते. दिवसाला 45000 लिटर अल्कहोल तयार करणारी डिस्टलरी आहे. पुढच्या काळात दिवसाला 135000 लिटर अल्कहोल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरु असल्याचे जगताप म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
सोलापूरचे अभिजीत पाटील, सांगलीचे मानसिंग नाईक यांच्यासह नव्या पाच कारखान्यांना मदत, 16 कारखान्यांच्या यादीचा नवा प्रस्ताव