धुळे : धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. यामुळे ऐन दुष्काळात हजारो लीटर पाण्याची नासाडी होते आहे. विशेष म्हणजे 24 तास उलटून गेले तरी पाईपालाईन दुरुस्त झाली नाही.

 

तापी जलवाहिनीतून धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी 48 किलो मीटरची पाईपलाईन आहे. धुळे तालुक्यात ही पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे दुष्काळात हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरु आहे.



धुळे तालुक्यातील लोकांना पिण्याचं पाणी नसल्यामुळे जलवाहिनी फुटून साचलेलं पाणी लोक घेऊन जात आहेत. खरं तर हे पाणी खड्ड्यात साचून गढूळ झालं आहे. तरीही लोकांना ते पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं आहे.

 

ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी हेळसांड कधी थांबणार, हा प्रश्न आता विचारला जातो आहे.