राज ठाकरे, रितेश देशमुख आणि धीरज देशमुख....
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2016 10:01 AM (IST)
लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळते आहे. दोन वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी मराठवाड्यात आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागात केलेल्या कामांची पाहणी आणि उपक्रमांचं उद्घाटनं राज ठाकरे करत आहेत. दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला अभिनेता रितेश देशमुखही धावून आला आहे. रितेशने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिला आहे.