महाराष्ट्राला हगणदारीमुक्त करण्यासाठी 'दरवाजा बंद अभियान'
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 30 May 2017 11:09 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राला हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडून दरवाजा बंद अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हागणदारीमुक्त तसंच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिग बी अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राला देशातील पहिलं हागणदारीमुक्त राज्य बनवण्याचा सरकारचा निर्धार असून मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र लवकरच हगणदारीमुक्त होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास महानायक अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केला.