वाशिम : एका अडीच वर्षांच्या चिमुरड्याने चक्क सापाला ठेचून मारलं आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आखातवाडा गावामध्ये ही आश्चर्यकारक घटना घडली आहे.


अडीच वर्षीय लखन अंगणात खेळत असताना त्याला साप विटांच्या ढिगाऱ्यामध्ये जाताना दिसला. त्यानंतर चिमुरड्याने स्वतःच सापाला ओढून बाहेर काढलं आणि ठेचून मारल्याची माहिती आहे.

सर्पदंशाच्या भीतीने या लखनच्या आईने त्याला दवाखान्यात नेले, परंतु त्याला सापाने कुठेही दंश केला नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेने गावात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.