यानंतर वाशिम आणि इतर भागातल्या आश्रमशाळांची सद्यस्थिती काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रय़त्न केला.. त्यात एबीपी माझाच्या हाती लागलेला पाहणी अहवाल हा धक्कादायक आहे..
वाशिममधल्या मुसळवाडी, कंकारवाडी, शेलूबाजार, केनवड यासह अनेक ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये मुलभूत सुविधा देखील नाहीत. स्नानगृहाअभावी कुठे मुलींना उघड्यावर अंघोळ करावी लागतेय. तर कुठे वसतीगृह नसल्यानं गोडाऊनमध्ये झोपावं लागतंय.
समस्यांचा हा पाढा फार मोठा आहे. मात्र, स्थानिक प्रशासन आणि सरकारसुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
दरम्यान, वाशिमचे भाजप आमदार राजेंद्र पाटणे यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरांना पत्र लिहिलं. एबीपी माझाने आश्रमशाळांबाबत दाखवलेल्या बातमीनंतर हे पत्र लिहिलं.याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत, नियम न पाळणाऱ्या आश्रमशाळांच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी पाटणे यांनी केली.