कोल्हापूर: कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसिना बाबू फरास यांची बहुमताने निवड झाली. तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने यांची निवड झाली.
कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम महिला महापौर झाल्या. श्रीमती फरास यांना 44 तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना 33 मते मिळाली. शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 44 नगरसेवक आहेत. तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33 नगरसेवक आहेत.
वर्षभरापूर्वी कोल्हापूर मनपासाठी निवडणूक झाली. त्यावेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसकडे महापौरपद तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद होतं.
त्यानंतर आता एक वर्षानंतर महापौरपद राष्ट्रवादीकडे आलं आहे.
त्यानुसार राष्ट्रवादीच्या हसिना फरास महापौर, तर काँग्रेसचे अर्जुन माने उपमहापौरपदी विराजमान झाले.