वर्धा : कौटुंबिक वादातून माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेलेल्या पतीने मेव्हण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वर्धा शहरातल्या समतानगरमध्ये रात्री उशीरा हा प्रकार घडला.
आरोपी राजू भगतचा त्याच्या पत्नीशी वाद झाला. या वादानंतर राजूची पत्नी आपल्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नीनं सोबत नेलेल्या आपल्या मुलीला परत आणण्यासाठी राजू भगत सासुरवाडीला गेला असता. तेव्हा त्याचा मेव्हणा देवानंद कांबळे याच्याशी त्याचा वाद झाला. या
वादातून राजू भगतने मेव्हणा देवानंदवर चाकूनं हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं देवानंदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आरोपीची पत्नी आणि तिचा आणखी एक भाऊ जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.