लातूर : मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवण्याच्या मुद्यावरुन टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे आज माध्यमांवर भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्त्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

 
पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पंकजा मुंडेंचा पारा चढला.

 
मी काही बोलणार नाही, तुम्ही शूटींग बंद करा अशी तंबी पंकजा मुंडेंनी दिली. ऐन दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना उद्योगांसाठी राखीव असलेलं पाणी दारुच्या कारखान्यांना देण्यात काहीच गैर नाही अशा अनुषंगाचं वक्तव्य काल पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून पंकजा
मुंडेंवर टीका होत आहे.

 

 

दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं

 

 

संबंधित बातम्या :


दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे