नागपूर : हिंगणघाटातील पीडित तरुणीची मागील 72 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे. शिवाय पेट्रोल टाकून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पीडितेचा चेहरा कोळश्यासारखा झाला असल्याची माहीती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून केली आहे. पुढील दीड महिने तिची प्रकृती आणखी गंभीर आणि चिंताजनक असेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जर पुढील दीड महिने तीच्या प्रकृतीने चांगला प्रतिसाद दिला तर तीच्या चांगल्या सुधारणेसाठी मदत होईल असंही डॉक्टर म्हणाले.
दरम्यान सकाळी 7.15 वाजता ही घटना घडली आणि तीला 9.15 वाजता आमच्याकडे कॅज्युअल्टीला आणण्यात आलं. तेव्हा तीची ऑक्सिजन लेव्हल खूप कमी होती. आम्ही ताबडतोब प्राथमिक उपचार केला. त्यानंचर लगेचच आम्ही सीसीयू बॅकअप सपोर्टमध्ये शीफ्ट केलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. पण अचानक तिची ऑक्सिजनची मात्रा कमी झाली. जर तिने आम्हाला ट्रकियोस्ट्रोमीची (कृत्रिम श्वास देणं) संधी दिला नसती तर आज तिची वाचण्याची संभावना कमी होती.
तोंड आणि नाकातून मोठ्या प्रमाणात धूर तिच्या शरीरात गेल्यानं तिच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे. मुलीचं शरीर आतून जळल्यामुळे तीला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. सध्या कृत्रिम रित्या श्वास देणं सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
Special Report | हिंगणघाटचं छपाक प्रकरण : हिंगणघाटात भर रस्त्यात तरुणीला जाळण्याचा प्रयत्न | स्पेशल रिपोर्ट
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु आहे. कालपासूनच्या चौकशीनंतर आरोपी विक्कीने हे कृत्य एकतर्फी प्रेमातूनच केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं भयंकर कृत्य करुन देखील आरोपी विक्की नगराळे याला त्याचा काहीही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे. पीडित तरुणाची प्रकृती कशी आहे, याची साधी विचारणा देखील तो करत नाही, असं पोलीस सूत्रांकडून समजत आहे.
दरम्यान या घटनेतंर आज हिंगणघाट सर्वपक्षीय बंदचं आवाहन करण्यात आलंय. या आवाहनला प्रतिसाद देत हिंगणघाटमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंदमध्ये सहभाग नोंदवलाय. बंदसह हिंगणघाटमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या