Wardha HinganGhat Case Update : वर्ध्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार आहे. कालही या प्रकरणाची सुनावणी पार पडली. काल न्यायालयात विकेश नगराळेवरील गुन्हा सिद्ध झाला असून नगराळेला दोषी ठरवण्यात आलं आहे. आज दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. कालच्या सुनावणीत आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्याला न्यायालयाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं आहे. आज न्यायालय दोषी विकेश नगराळेला शिक्षा सुनावणार असून निकाल देणार आहे.
3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना काल हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
विशेष म्हणजे, 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले होते. अखेर आज न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे विकेश नगराळेला दोषी सिद्ध केलं.
3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोषी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BLOG : कायदे बदलून महिलांवरील अत्याचार थांबतील का?
- Hinganghat Burning Case | हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणी आई-वडिलांची साक्ष नोंद, आईला अश्रू अनावर
- माझा विशेष | हिंगणघाटच्या आरोपीचा हैदराबादप्रमाणे 'न्याय' व्हावा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha