वर्धा : दारुसाठी बेवडे काय करतील याचा नेम नाही आणि त्यांना दारु पुरवण्यासाठी गुत्तेदार काय करेल याचाही नेम नाही. वर्धा जिल्हा हा खरं तर दारुबंदी असलेला जिल्हा. पण त्याच जिल्ह्यात एका महिला दारु विक्रेत्याने केलेला प्रताप वाचून तुम्ही तोंडात बोटं घालाल. महिलेने चक्क देव्हाऱ्याच्या मागे दारुचा साठा लपवला.

वर्ध्याता एका गुप्त भुयारावर पोलसांनी छापा मारला. वरकरणी देव्हारा असल्याचं कोणालाही वाटेल. समोर संत, देव-देवतांचे फोटो. पण त्यामागे सोमरसाचा साठा ठेवला होता.

पोलिसांनी अख्खं घर धुंडाळलं, तरी दारुचा थेंबही मिळाला नाही. पण जेव्हा देव्हाऱ्यातले फोटो हलवले, तेव्हा हा गुप्त खजिन्याचा मार्ग दिसला. भिंतीला भगदाड पाडून त्यामध्ये दारुचा साठा लपवल्याचं पोलिसांना आढळलं.

ही कलाकारी करणाऱ्याला या आयडियासाठी पुरस्कारच द्यायला पाहिजे. पण दारुची नशाच ती, वाट्टेल ते करायला लावते.

पिते दारु डोळे मिटुनी
जात दारुड्याची
मनी दारुड्याच्या का रे
भीती पोलिसाची

हे असले प्रताप करताना देवाला तरी सोडा, असं म्हणत बापूंनीही पुन्हा 'हे राम' म्हटलं असतं.