औरंगाबाद:राठा मोर्चाच्या बंददरम्यान वाळूज एमआयडीसीत झालेल्या तोडफोडप्रकरणी जवळपास 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये कंपन्यांचे 60 कोटी पेक्षा अधिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.


पोलिसांनी कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धरपकड सुरु झाली आहे. वाळूज एमआयडीसीत विद्ध्वंस करणाऱ्या 37 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे.  आतापर्यंत पोलिसांनी 47 जणांना ताब्यात घेतलं असून यातील 37 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशी झाल्यानंतर अटक झालेल्यांवर पोलिसांकडून कट कारस्थानाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

माराठा आंदोलनादरम्यान  9 ऑगस्ट रोजी ओरंगाबादमधील वाळुज एमआयडीसीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. 

औरंगाबादमध्ये बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात हिंसक वळण लागलं. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय, तर आणखी 10 ते 12 कंपन्यांचंही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.

आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून मोडतोडही केली. वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाईट या कंपन्यांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटवर चढून आत प्रवेश केला. काही कंपनींच्या बंद गेटची चावी सिक्युरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचं, कंपनीच्या मालकांनी सांगितलं.

उद्योगांना संरक्षण देण्याची गरज आहे. कंपन्या फोडल्याने मोठं नुकसान झालंय. आमच्या उद्योगांना संरक्षण मिळेल का, नसेल मिळणार तर आम्हालाही गुंतवणूक करण्यावर विचार करावा लागेल, असे उद्योजक संघटनेचे म्हणणे आहे.

'तोडफोडीची सीआयडी चौकशी करा'

वळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.

संबंधित बातम्या 

बंद कंपन्यांमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी औरंगाबादेत 41 जण अटकेत 

तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी 

बंद कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड, औरंगाबादेत आंदोलकांची धरपकड सुरु