Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Kej Court Beed: बीड जिल्ह्यातील केज न्यायालयानं खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराडलाआज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान, खंडीणीबाबत वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीनं कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळंया प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली होती. त्यानंतर आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला होता. मात्र वाल्मिक कराडची यातून सुटका झाली होती. मात्र, आज कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराडला आज बीड जेलमध्ये नेलं जाणार
दरम्यान, वाल्मिक कराडला आज बीड जेलमध्ये नेलं जाणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जाईल. त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण आता सेशन कोर्टामध्ये सीआयडीने अर्ज केला आहे, कदाचित सीआयडी त्यांना आज सुद्धा हजर व्हा असं म्हणू शकते.
कोर्टात नेमकं काय झालं?
आज न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले होते.
वाल्मिक कराडच्या वकीलाचाही जोरदार युक्तीवाद
वाल्मिक कराडच्या वकिलाने देखील कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे. वाल्मि कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली? हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला? असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा. आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले होते.
सगळ्या आरोपींना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, धनंजय देशमुखांची मागणी
वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, या हत्याकांडातील जे आरोपी आहेत मग ते कोणी पण असो, त्या सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आम्ही कुणालाही सोडणार नाही आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्ही न्याय मागत आहोत आणि कायम न्यायाच्याच भूमिकेतच राहू, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही एसआयटीचे प्रमुख तेली साहेब यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यानंतर ते आम्हाला स्पष्टीकरण देतील. आमची त्यांना एकच मागणी आहे की, तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. एका लोकप्रतिनिधीची निर्घुण हत्या घडली आहे, ती कोणी घडवून आणली? कशा पद्धतीने झाली? यात कोण कोण सहभागी आहे? या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशा भूमिकेत आम्ही असल्याचे त्यांनी म्हटले
वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे परळीत आंदोलन
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु आहे. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे.वाल्मिक कराडच्या मातोश्री देखील आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर (Parli Police Station) ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Walmik Karad: 15 दिवसात काय तपास केला, वाल्मिक कराडने सहकार्य केलं नाही यांचं उदाहरण सांगा?; वकिलाच्या युक्तीवादाने सुटकेचा मार्ग मोकळा?