Walmik Karad Kej Court :  केज कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता 14 दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोर्टातच असणार आहे. खंडणी प्रकरणतील आरोपी वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात दाखल करण्यात आलं होत. आज न्यायाधिशांपुढे याप्रकरणी सुवानणी झाली आहे. यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडच्या वकिलीने युक्तीवाद केला आहे. यानंतर न्यायालयानं 14 दिवसांच्या कोठडीचा निर्णय दिला आहे. त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे.

Continues below advertisement

वाल्मिक कराड यांना पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीनं केज कोर्टात हजर केले होते. वाल्मिक कराड आज सकाळी सीआयडीसमोर शरण आले होते. अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरु झाली होती. अखेर न्यायाधिशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी दिली आहे. 

कोर्टात नेमकं काय घडलं?

वाल्मिक कराड यांचे  वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले. सरकारी वकील एस. एस. देशपांडे दाखल झाले होते. मात्र, सीआयडीचे वकील म्हणून जे.बी. शिंदे यांनी युक्तिवाद केला. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते. न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का ?असं विचारलं, यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं.  सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचं कोर्टासमोर मांडलं.   या अनुषंगाने हत्या आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे, असं म्हणत शिंदे यांनी सीआयडीच्या वतीनं 15 दिवसांची सीआयडी कोठडी न्यायालयाकडे मागितली. 

Continues below advertisement

दरम्यान, केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायाल्यासमोरून हुसकावून लावलं होतं. केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशनसमोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला होता. या मार्गांवरील वाहतूक सुरु असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलीसांनी घेतली होती. 

 

महत्वाच्या बातम्या:

Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?