Walmik Karad : खंडणी प्रकरणतील आरोपी वाल्मिक कराड यांना केज पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं आहे. यापूर्वी केज रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.   

Continues below advertisement

दरम्यान, केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायाल्यासमोरून हुसकावून लावलं आहे. केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशनसमोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला जात आहे. या मार्गांवरील वाहतूक सुरु असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलीस घेत आहेत.  दरम्यान, वाल्मीक कराडचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर सरकारी वकील एस एस देशपांडे हे देखील कोर्टात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर  SP सचिन पाटील हेदेखील कोर्टात आले आहेत. कोर्टाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

वाल्मिक कराडने आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने आज सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासासाठी वाल्मिक कराडला केज पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. त्यानंतर थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. तसेच, मंत्री धनजंय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. कारण, वाल्मिक कराडने शरणागती पत्कारण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वत:च्या खासगी कारने तो सीआयडी कार्यालयात हजर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?