Maharashtra Weather New Year : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दरम्यान, या नवीन वर्षात नेमकं वातावरण कसं असेल, याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.1 जानेवारीपासून महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नसल्याची माहिती पंजाबराव डखांन दिली आहे. आज राज्यात कडाक्याच्या थडीचा अंदाज डखांनी वर्तवला होता. त्यानंतर मात्र, राज्यात थंडीचा जोर वाढणारक आहे. त्यामुळं नागरिकांनी वाढत्या थंडीमुळं योग्य ती काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलं आहे.
1 जानेवारीपासून 15 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार
पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारीपासून 15 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने होणार असा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे. त्यामुळं वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारीपासून त्यापुढील पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक, नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात त्या पाच दिवसात थंडीचा प्रभाव अधिक राहील, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील खुळे यांनी दिली आहे. पुढचे काही दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय.
महत्वाच्या बातम्या: